Maharashtra : “जातीपातीचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्याच जन्मापासून सुरु झाले… मराठा आणि इतर समाजात फूट पाडणे हाच उद्देश”

Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. जातीपातीच्या राजकारणाचा आरोप राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. मनसेची भाजपशी जवळीक वाढल्याने आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या निशाण्यावर आली आहे.

शरद पवार हे राजकारणासाठी जातीयवादाचा वापर केला जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. जातीपातीचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्याच जन्मापासून सुरु झाले असल्याचेही राज ठाकरे म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, राष्ट्रवादी जातीय राजकारणावरुन आत्ताच बोलते असे नाही तर याआधीही सभांमधूनही त्यांनी जातीयवादावर चर्चा केली आहे असेही राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

मुस्लिम मतांसाठीच राष्ट्रवादीकडून जातीपातीचे राजकारण सुरु असून मराठा आणि इतर समाजात फूट पाडणे हाच महत्वाचा उद्देश असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे.

राज ठाकरे यांची पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी जवळीक वाढली होती. त्यावेळी राज ठाकरे आणि मनसे गटाचे नेते शिवसेना आणि भाजपवर टीका करताना दिसत होते.

मात्र आता मनसेची भाजपशी जवळीक वाढल्याने आता शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस निशाण्यावर आली आहे. शरद पवार यांच्यावर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे.