अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना जी विजबिले दिले ती सदोष आहेत. पुढील वर्षी पन्नास टक्के बीजबिल माफीचे आश्वासन दिले जात आहे, मात्र बिलेच चुकीच्या तांत्रिक बाबींवर दिली असतील तर शेतकरी ही बिले भरू शकत नाहीत.
आणि आता वीज कंपनी हुकूमशाही पद्धतीने सरसकट वीज कनेक्शन तोडत आहे. यंदा पाऊस चांगला आहे, विहिरींना पाणी आहे, अशात जर वीज कनेक्शन जर तोडल्यास रब्बी हंगाम शेतकरी करू शकेल का,
या परीस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटना शांत बसणार नाही. त्यामुळे तोडलेले वीज कनेक्शन तातडीने जोडा, योग्य बिले द्यावीत. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.
जामखेडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यसरकरच्या वीज धोरणावर आणि करवाईवर आसूड ओढले. कोरोना काळात एकीकडे वीजबिल देणे थांबवले मात्र या काळातील सरासरी बिले काढण्यात आली.
वीजमंत्री आपले आश्वासन पाळत नाहीत, त्यापुढे जी वीजबिले काढली गेली ती तांत्रिक पद्धतीने जादाची बिले काढली गेली. मुळात जागेवर येत प्रत्यक्ष रिडींग किती घेतले, त्यात तथ्य किती हा संशोधनाचा भाग आहे
असा आरोप शेट्टी यांनी यावेळी केला. अतिवृष्टी, पीकविमा याबाबत सरकार उदासीन आहे. उसाचे पैसे एकरकमी मिळत नाहीत. यापरस्थितीत शेतकऱ्याने काय करावे असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला.