अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यातील अनेक तालुक्यात खरीप हंगामाच्या मशागती झाल्या असून पावसाच्या प्रतीक्षेत असताना मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भाग काहीसा सुखावला आहे.
यातच पुणतांब्यात जोरदार वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे परिसरात पाणीच पाणी झाले आहे. .
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे.ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हवेत काहीसा गारवा निर्माण झाला आहे.
यातच पुणतांबा परिसरात मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गाला खरीपाच्या पेरणी साठी पेरणीपूर्व मशागती सुरु करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान पुणतांबा मध्ये मागील दोन दिवसात सरासरी तीन इंच पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पाऊसामुळे परिसरात कोणाचेही फारसे नुकसान झाले नाही.
बहुतांशी शेतकरी वर्गाने रबबीच्या पिकांची काढणी करून शेतीची नागरंट केलेली असल्यामुळे खरीप पिकांच्या पेरणीसाठी हा पाऊस चांगला असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.
दरम्यान शेतकरी वर्गाकडून खरीप पिकांच्या पेरणीसाठी आवश्यक साधन सामुग्री गोळा करण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे.