ऑक्सिअन प्लांट आणि रिफिलिंग सेंटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यातच दरदिवशी हजारोंच्या संख्येने कोरोनाबाधितांची नोंद जिल्ह्यात होत आहे.

दरम्यान सध्या कोरोना बाधितांवर उपचार करताना ऑक्सिजनची टंचाई जिल्ह्यात भासू लागल्याने नगर शहरात ऑक्सिजनचा प्लांट सुरु करण्यात आला आहे.

मात्र या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यातील काही रिफिलिंग सेंटर व एजन्सीमधून जिल्हा रुग्नालय व खाजगी रुग्नालयाना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येतो.

दरम्यान जिल्ह्यातील ऑक्सिजनची वाढती मागणी व अपुऱ्या पुरवठ्यामुळे खाजगी रुग्नालयातील कर्मचारी व नागरिक ऑक्सिजन मिळण्यावरून जिल्ह्यातील रिफिलिंग सेंटर व एजन्सीमध्ये जाऊन वाद घालण्याच्या घटना घडत आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय येथील ऑक्सिअन प्लांट आणि रिफिलिंग सेंटर व एजन्सी यांचा १०० मीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याचा आदेश प्रशासनाने काढला आहे.

या १०० मीटर प्रतिबंधित क्षेत्रात सदर रिफिलिंग सेंटर व एजन्सी यांच्याशी संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळता अन्य कोणालाही बेकायदेशीररीत्या कोणालाही प्रवेश करता येणार नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24