अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोना व लॉकडाउन परिस्थितीमुळे सर्वत्र बंद पाळण्यात आला आहे. याचाच फायदा घेत नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सूनसान आवारात सध्या जुगारी व मद्यपींचा धुडगूस वाढला आहे.
यामुळे अशा अवैध गोष्टींना आळा बसावा यासाठी पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी व्यापारी व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
नेवासा व नेवासा फाटा परिसरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नेवासा नगरपंचायत व मुकिंदपूर ग्रामपंचायतीने २३ तारखेपर्यंत पूर्णपणे बंद पाळण्याचे आवाहन केले आहे.
या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवली आहेत. परंतु याच परिस्थितीचा काही जणांकडून गैरफायदाही घेतला जात आहे.
या जागेचा दारू पिण्यासाठी व पत्ते खेळण्यासाठी उपयोग करून घेत आहेत. या ठिकाणी पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे याचा पुरेपूर फायदा ही मंडळी उठवत आहेत.
नेवासा पोलिसांनी या परिस्थितीची पाहणी करून त्वरित हे प्रकार बंद करावेत अशी मागणी केली जात आहे.