अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बळीराजा अडचणीत सापडला होता.
त्यानंतर आस्मानी संकटामुळे बळीराजाला हतबल करून सोडले, अनेक संकटाना मात देत असलेल्या बळीराजाला पुन्हा एकदा संकटाला सामोरे जावे लागत आहे.
मात्र अशाच एका वैतागलेल्या शेतकऱ्याने चक्क असे काही केले कि यामुळे बळीराजा सध्या किती हतबल झालेला आहे याची कल्पना आपल्याला येईल.
सध्या कोबीचे उत्पादन वाढले असून त्याचे भाव मात्र पडले आहेत. याला वैतागून कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील शेतकरी नाना रामचंद्र सुद्रिक यांनी कोबीच्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला.
सध्या कोबीचे उत्पादन वाढले आहे. करोनाच्या काळात भाजीपाल्याचे मागणी वाढल्याचे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती.
मात्र, प्रत्यक्षात उत्पादनात वाढ होऊन तुलनेत मागणी कमी झाल्याने भाव पडले आहेत. बाहेरच्या शहरांत कोबी पाठविणे परवडत नाही.
त्यामुळे स्थानिक बाजारात विक्रीसाठी घेऊन आले तर त्याला भाव मिळत नाही. आठवडी बाजारात एक ते दोन रुपयाला कोणी कोबीची गड्डा घेत नाही.
त्यामुळे बाजारा आणण्याच खर्चही निघत नाही. अशा परिस्थिती पीकच मोडून काढण्याचा निर्णय शेतकरी घेत आहेत.
सुद्रिक यांनी अशाच पद्धतीने आपला दोन एक क्षेत्रात ट्रॅक्टर फिरविला. यापूर्वी टोमॅटोचे भाव पडल्याने शेतकऱ्यांवर अशी वेळ आल्याची उदाहरणे आहेत,
अर्थात सध्याही टोमॅटोला समाधानकारक भाव नाहीत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरीही अडचणी आहेत. शेती मालाच्या हमी भावासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.
त्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चे काढले जात आहेत. इकडे मात्र भाव मिळत नसल्याने पिकात ट्रॅक्टर चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे सर्वच पक्षांनी राजकारण केले असून प्रत्यक्षा प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे भावातील अनिशिततेमुळे शेतकऱ्यांवर अशी वेळ नेहमीच येते.