अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- देशाचे प्रधानसेवक नरेंद्र मोदी 2015 मध्ये माझ्या नशिबाने जर पेट्रोलचे भाव कमी झाले असते तर चांगलं झालं असतं असे सांगत होते. परंतु, 2021 मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आता कुणाचं नशीब आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
दरम्यान जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत हे मोदींनी जनतेला सांगितले पाहिजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी यापूर्वी केली होती. मात्र, मोदींनी या प्रश्नाचे उत्तर दिले नाही उलट पेट्रोल – डिझेलचे दर वाढवून ठेवले आहेत.
याच दरवाढीचा धागा पकडत नवाब मलिक यांनी मोदींना 2015 मधील त्यांच्या वक्तव्याची आठवण करून देताना आता पेट्रोलने शंभरी गाठली मग हे नशीब कुणाचे अशा आशयाचे ट्विट करत नवाब मलिक यांनी मोदींवर हल्लाबोल केला.
पेट्रोलने शंभरी पार केल्यानंतर 2015 मध्ये बोलणारे मोदी 2021 मध्ये काहीच बोलत नाही. त्यामुळे शेवटी काय ‘बदनसीब जनता’ असे ट्वीट करत आणि व्हिडीओ शेअर करत नवाब मलिक यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.