अहमदनगर शहरातील दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-  नगर शहरातील काही भागात नळाला दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी महापालिकेत दाखल होत आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने दोष दुरूस्त करण्याचे नियोजन आखले आहे.

शहरातील धरती चाैकासह बुरडगल्ली भागात दुषीत पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत बाळासाहेब भंडारी यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर परिसरात ड्रेनेजलाीन लिक असल्यामुळे नळांना दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे.

त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याप्रकरणी पाणीपुरवठा विभागप्रमुख आर. जी. सातपुते यांनी संबंधित अभियंत्यांना दुरूस्तीच्या सुचना दिल्या आहेत.

शहरातील नळपाणीपुरवठ्याच्या लाईन काही ठिकाणी ड्रेनेजलाईन क्राॅस करतात. त्यामुळे ड्रेनेजजवळ जलवाहिनीला गळती लागल्यास मैलामिश्रीत सांडपाणी वाहिनीत जाते.

हा प्रश्न वारंवार समोर येत असला तरी मनपा अद्याप त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढता आला नाही. शहरातील दूषित पाण्याचा प्रश्न आता गंभीर बनला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24