अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- अहमदनगर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे कोणत्या प्रभागांमध्ये दोन दिवसानंतर तर कोणत्या प्रभागांमध्ये चार दिवसानंतर पाणी सुटते हा प्रश्न लवकरात लवकर सुटणार आहे व येणाऱ्या काळात आम्ही लाईट पाणी रस्ते व नागरी सुविधा तत्पर देणार
व उपनगर असलेल्या सावेडी परिसरात वाढणारी लोकसंख्या पाहता अनेक नागरी प्रश्न भेडसावत असल्याचे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले तर येथील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नगरसेवक भय्या गंधे,
नगरसेविका आशाताई कराळे, नगरसेविका सोनाबाई शिंदे, नगरसेवक मनोज दुलंम यांनी केलेल्या पाठपुराव्याची त्यांनी कौतुक केले.
सावेडी येथील बिशपलॉर्ड कॉलनी येथे पिण्याच्या पाण्याचे पाईप लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते याप्रसंगी तायगा शिंदे, शिवाजी कराळे, उदय कराळे,
मनोज ताठे, नितीन खंडागळे, ॲड. रोधाताई गायकवाड, ॲड. कसोटी साहेब, ॲड.पंडित साहेब, राजू चव्हाण, पगारे सर, कपिल पगारे, देव भोसले, दिनकर पाटोळे, हर्षद खंडागळे, जय खरात, ज्ञानेश्वर धिरडे आदीसह बिशपलॉर्ड कॉलनीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावेडी येथील बिशपलॉर्ड कॉलनी येथे पिण्याच्या पाण्याचे अनेक वर्षापासून मोठी समस्या होती व येथील लोकसंख्या पाहता येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता
नागरिकांनी अनेकदा तक्रारी करून नगरसेवक यांना येथील समस्या संदर्भात विषय मांडला त्यामुळे नगरसेवकांनी पाठपुरावा करून येथील प्रश्न सोडविण्यात आला व या भागांमध्ये चारी नगरसेवक योग्य निवडून दिल्यामुळे या भागात विकास होत आहे.
या कामाच्या माध्यमातून पाईपलाईन टाकल्याने मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असल्याची आनंदी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.