अरे बापरे…! आंदोलकांनी मारल्या ‘त्या’ कारखान्याच्या गव्हाणीत उड्या ..?

Maharashtra News:विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यात ऊसतोड व वाहतूक बंद आंदोलन पुकारले होते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या आंदोलनास प्रसाद शुगरच्या व्यवस्थापनाने प्रतिसाद न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट कारखान्याच्या गव्हाणीत उडी टाकून कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर दोन दिवसांचे ऊसतोड व वाहतूक तोड बंद आंदोलन पुकारले होते.

Advertisement

त्याप्रमाणे शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना पूर्वकल्पना देण्यात आली असताना त्यास प्रतिसाद न दिल्याने तालुक्यातील प्रसाद शुगर सुरू असल्याचे समजताच जिल्हाध्यक्ष मोरे कार्यकर्त्यांसह प्रसाद शुगरच्या कार्यस्थळावर पोहचले.

त्यांनी कारखान्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले व नंतर कारखान्याच्या गव्हाणीकडे जाऊन थेट गव्हाणीत उड्या टाकल्या मोरे व कार्यकर्त्यांनी गव्हाणीत उड्या टाकताच पोलीस यंत्रणा व कारखान्याच्या सुरक्षा रक्षक व प्रशासनाची एकच धावपळ उडाली.

पोलिसांनी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना तातडीने गव्हाणीतून बाहेर काढून त्यांना ताब्यात घेतले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन दिवस साखर कारखाने बंद ठेवून केंद्र शासनाला साखर निर्यातीचे धोरणाबाबत बदल करण्यास भाग पाडण्यासाठी आवाहन केले होते; मात्र तसे झालेले नसल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अधिक उग्ररूप धारण केले होते.

Advertisement

अनुचित प्रकार घडू नये म्हणून कारखाना व्यवस्थापन व पोलिसांनी विशेष खबरदारी घेतलेली होती. गेल्या आठ दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील साखर कारखानदारांना भेटून दोन दिवस कारखाने बंद ठेवण्याचे निवेदन दिलेले होते; परंतु फारसा प्रतिसाद मिळालेला नसल्याने संघटनेचे कार्यकर्ते अधिक आक्रमक बनले आहेत.