अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे दि.८ फेब्रुवारी रोजी आंबेगाव (पुणे) येथील रमेश जाधव या इसमाची अनैतिक संबंधातून कोयत्याने वार करत मुंडके धडावेगळे करून हत्या केल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलीसांनी ५ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ॲड. रोहित गायकवाड यांनी आरोपींच्या वतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे येथील रमेश जाधव या इसमाची दि. ८ फेब्रुवारी टाकळी कडेवळीत शिवारात सुषमा उर्फ गुड्डी बाळासाहेब भोसले,
तेजस बाळासाहेब भोसले, अमोल गोविंद कांबळे, राजेश विठ्ठल गायकवाड तसेच एक अल्पवयीन मुलगा असे ५ जणांनी अनैतिक संबंधातून कोयत्याने वार करत मुंडके धडावेगळे करून हत्या केली होती.
श्रीगोंदा पोलीसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ हालचाल करत आरोपींना अटक करून त्यांच्याकडून हत्याकांडात वापरलेले कोयता,
टिकाव, खोरे, व मयताच्या अंगावरील सोने, मयताची व आरोपीनी गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी गाड्या ताब्यात घेऊन २४ फेब्रुवारी रोजी श्रीगोंदा येथील ज्युडीशियल मेजिस्ट्रेत फस्ट क्लास यांच्या पुढे हजर केले असता
पोलीसांच्या बाजूने सरकारी अधीवक्ता यांनी युक्तीवाद करत आरोपींना ४ दिवसांची पोलिस कोठडी मागितली मात्र या प्रकरणी आरोपींचे वकील ॲड. रोहित गायकवाड यांनी केलेला
युक्तीवाद ग्राह्य धरत ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर अल्पवयीन आरोपीला चार्जशीट दाखल होईपर्यंत जामीन दिला. या प्रकरणात ॲड. झुंबरराव गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.