प्रतिक्रिया पडली महागात; लिपिक कर्मचाऱ्याला दिले साफसफाईचे काम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- संस्थानच्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी असलेल्या विठ्ठल पवार यांनी कामगार नेते असल्याने काही दिवसांपूर्वी साईबांबा संस्थानमधील कामगारांना करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने लसीकरण,

राखीव बेड, नैसर्गिक विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे अशी प्रतिक्रिया संस्थान प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता लोकल चॅनेलला दिली होती.

त्यानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, यानंतर पंधरा दिवसांच्या आतच पवार यांची साईआश्रम भक्तनिवासातून उचलबांगडी करून थेट स्वच्छता विभागात रवानगी केली.

यादरम्यान त्यांची साईआश्रम भक्तनिवासात कर्मचारी म्हणून दि. 1 जूनपर्यंत रजा मंजूर असताना अधिकार्‍यांनी कामावर येत नाही म्हणून साई संस्थानच्या इतिहासात प्रथमच त्यांच्या घरावर नोटीस लावली होती.

शैक्षणिक पात्रता असताना कामगार हितासाठी आवाज उठवला म्हणून विठ्ठलराव पवार यांनी केलेल्या चांगल्या कामाची अशी पावती का? असा सवाल जनसामान्यांतून उपस्थित होत आहे.

शैक्षणिक पात्रता लिपीकाची असताना एका कर्मचाऱ्याला संस्थानने स्वच्छता करण्यासाठी झाडू दिला ही बाब सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24