शहरातील रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य; नागरी समस्यांकडे मनपाचे दुर्लक्ष

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. यातच शहरातील काही रस्त्यांवरीलपथदिवे बंद असल्याने शहरातील रस्त्यांवर आधाराचे साम्राज्य पसरले आहे.

शहर आधीच अंधरात बुडाले असतानाच पावसाने रस्त्यांची दाणादाण उडाली आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात डबक्यातून प्रवास करण्याची वेळ नगरकरांवर ओढावली आहे. नागरिकांच्या या महत्वपुर्ण समस्यांबाबत मनपाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.

खड्डे, पावसाचे पाणी साठणे व वाढती अतिक्रमणे अशा अनेक समस्यांच्या विळख्यात शहरातील अनेक रस्ते सापडले आहे. अशातच रस्त्यांवर पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे किमान देखभाल दुरुस्ती करून दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

खड्डे मोठ्या प्रमाणांवर पडले असल्याने दुचाकी घसरून पडण्याच्या घटनाही याठिकाणी सातत्याने घडत आहेत. तसेच पाणी साचून राहत असल्याने दुर्गंधी सुटली असून डास आणि मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत.

त्यात गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात पाऊस पडत आहे. या पावसामुळे रस्त्यांतील खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. अंधारामुळे डबक्यांमधून प्रवास करणे कठीण झाले आहे. मध्यवर्ती शहरातील रस्ते भुयारी गटार योजनेचे पाइप टाकण्यासाठी खोदण्यात आलेले आहेत. दरम्यान शहरातील रस्त्यांची दुरुस्तीही लांबली.

याशिवाय रस्त्यांतील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने निविदाही मागविल्या होत्या; परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रस्ते दुरुस्तीचेही काम रखडले आहे. या पावसामुळे दिल्लीगेट येथे पाण्याचे तळे साचले होते.

सावेडी, बोल्हेगाव, नागापूर, नालेगाव, केडगाव, बुरुडगाव आदी भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. `परंतु महापालिकेकडून मात्र याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24