डिंबे धरणातून ओव्हरफ्लोचे पाणी सोडल्याने घोड धरण पन्नास टक्के भरणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-  कुकडी प्रकल्पातील सर्वात जादा क्षमता असलेले डिंबे धरण १०० टक्के भरले धरणातून नदीत ७ हजार ६८० क्युसेकने तर दोन्ही कालव्यांना ७५० क्युसेकने पाणी सोडले आहे.

पिंपळगाव जोगे धरणात १ हजार ९६८ एमसीएफटी म्हणजे ५१ टक्के भरले आहे. कुकडी प्रकल्पातील डिंबे, वडज धरणे ओव्हरफ्लो झाले असून, डिंबे धरणातून ओव्हरफ्लोचे ७ हजार ६८० तर वडज मधून २ हजार ६५५ क्युसेकने घोड नदीत पाणी सोडण्यात आले आहे.

मंगळवारी सायंकाळी हे पाणी घोड धरणात येऊन धडकले आहे. त्यामुळे घोड धरणातील पाणीसाठा बुधवारी सायंकाळपर्यंत ५० ते ५५ टक्के होण्याची अपेक्षा आहे.

घोड धरण मंगळवारी चार वाजेपर्यंत ३४ टक्के धरले आहे. येत्या चोवीस तासात धरणात एक टीएमसी पाण्याची आवक होणार आहे. त्यामुळे घोड धरणाचा पाणीसाठा ५५ टक्के होण्याची आशा आहे.

विसापूर तलावाची पाणी पातळी १० टक्क्यावर स्थिर आहे. सीना धरण ७४ टक्के भरले आहे. धरणात १ हजार ३६३ एमसीएफटी तर जामखेडचा खैरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.