पुतळयाचे स्थलांतराने शिवप्रेमी दुखावले; बंदचे केले आवाहन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुर्णाकृती पुतळा श्री शिवाजी चौकातच बसवावा या मागणीसाठी तसेच हा अश्वारूढ पुतळा दुसरीकडे बसविण्यात

येणार या नगराध्यक्षांच्या भूमिकेच्या विरोधात रविवार दि. 4 एप्रिल रोजी श्रीरामपूर बंदचे आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीने केले आहे.

शिवाजी चौकात महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा बसवावा ही लोकभावना वाढू लागल्याने या मागणीला बायपास करण्यासाठी नगराध्यक्षांनी हा पुतळा दुसरीकडे अचानकपणे बसविण्याचा घाट घातला आहे.

हा श्रीरामपूरकरांच्या लोकभावनेचा अपमान आहे. असे काही घडविण्याचा नगराध्यक्षांनी प्रयत्न केल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटून, गंभीर परिणाम नगरपालिकेला भोगावे लागतील.

त्याचबरोबर, शिवजयंतीच्या दिवशी काही शिवप्रेमींनी श्री शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापन केला होता.

नगरपालिकेने तातडीने अत्यंत अपमानास्पद पद्धतीने हा पुतळा तेथून हलविला. हे कृत्य हिटलरशाहिलाही लाजवणारे असल्याची संतप्त भावना अनेक शिवप्रेमी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या दोन्ही गोष्टींच्या निषेधार्थ श्री शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीने, रविवार दि. 4 एप्रिल रोजी श्रीरामपूर बंदचे आवाहन केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24