अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- मुद्दा कोणताही असो सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोपाच्या माध्यमातून कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातच सध्या कोरोनामुळे राजय सरकार व केंद्र सरकारमध्ये शीतयुद्ध जुंपलेलं आहे.
यातच जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे. हे बडे नेते दुसरे तिसरे कोणी नसून एक आहते महसूलमंत्री थोरात तर दुसरे आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील…
राज्यातील कोरोनाची स्थिती, लसींचा तुटवडा, ऑक्सिजन व बेड्सची कमतरता यांवरून भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकरावर जोरदार हल्लाबोल केला होता.
यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पलटवार केला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्त्व देत नाही, असा पलटवार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
दरम्यान थोरात पत्रकारांची संवाद साधत असताना पत्रकारांनी महसूलमंत्र्यांना विखे पाटलांच्या टीकेबाबत प्रश्न विचारला होता.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले कि, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काय आरोप केले त्याला महत्त्व देत नाही. ते त्यांची आरोप करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.
कोरोनाचा संसर्ग केवळ एकट्या नगरमध्येच नाही तर सर्वत्र हीच परिस्थिती आहे. मृत्यूची संख्या वाढत आहे ही वस्तुस्थिती आहे आणि ती नाकारता येणार नाही, असे थोरात म्हणाले.