अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- करोनाच्या पहिल्या व दुसर्या लाटेत राज्य सरकारने अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे. मात्र टास्क फोर्सने सांगितलेल्या धोक्यानुसार तिसरी लाट अत्यंत मोठी असू शकते.
तसेच कोरोनाच्या दुसर्या लाटे मध्ये आपल्या जवळचे अनेक जण सोडून गेले. हे दु:ख भयावह आहे. तिसरी लाटेमध्ये अत्यंत मोठा धोका आहे म्हणून काळजी घेणे हाच आपल्यापुढे सर्वोत्तम उपाय आहे. असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांचा आढावा बैठकीत ते बोलत होते. थोरात म्हणाले की, दुसर्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले.
सरकारने पारदर्शकपणे काम करताना कोणताही आकडा लपवला नाही. संगमनेरमधील प्रशासनाने चांगले काम केले आहे. टास्क फोर्सने दिलेल्या संकेतानुसार तिसरी लाट मोठी असण्याची शक्यता आहे.
यामध्ये पन्नास लाख रुग्ण असू शकतात. तर पाच लाख लहान मुलांना संसर्ग होऊ शकतो. अशा परिस्थितीत स्थानिक प्रशासनाने शोध मोहीम सुरू करून तपासणी व त्यावर ट्रीटमेंट करणे सुरू करावे.
या काळात नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे. लसीकरण हाच कोरोना रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाय आहे. याबाबत कोणीही निष्काळजीपणा करू नका. तसेच थोरात म्हणाले, दुसर्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता यामुळे काही प्रमाणात मृत्यू झाले.
राज्य सरकारने मात्र अत्यंत पारदर्शकपणे काम करताना कोणताही आकडा लपवला नाही. उलट काही राज्यांनी आकडे लपवले त्यांचे मोठे हाल झाले. आमदार डॉ. तांबे म्हणाले की, तिसरी लाट मोठी असल्याने
नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनात सज्ज झाले असून करोना रोखण्यासाठी आपण सर्वतोपरी एकजुटीने काम करूया.
या काळात नागरिकांचे सहकार्य अत्यंत गरजेचे आहे. खाजगी रुग्णालयांनी ज्यांना शक्य आहे, त्यांनी ऑक्सिजन निर्मिती तातडीने सुरू करावी.