ताज्या बातम्या

आमदार नितेश राणे यांचा उदय सामंतांना खोचक टोला; म्हणाले, “ना फ्लॉवर है, ना फायर है, फक्त बटरफ्लाय…”

Published by
Ahmednagarlive24 Office

सिंधुदुर्ग : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल विधानसभेत अर्थसंकल्प (Budget 2022) जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पमध्ये अनेक योजना या शेतकऱ्यांसाठी असल्याचे दिसत आहे. मात्र भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्याला काहीच मिळाले नसल्याचे म्हणत नितेश राणे यांनी म्हंटले आहे. यावरूनच त्यांनी पालकमंत्री उदय सामंत (uday Samant) यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारवरही (Mahavikas Aghadi) निशाणा साधला आहे.

सिंधुदुर्ग (Sindhudurg) व विजयदुर्ग किल्ल्याला फक्त 14 कोटींचा भरीव निधी दिला गेला. याचा मी निषेध करतो. पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत, कॅबिनेटला उपस्थित राहत नाहीत. रत्नागिरी विमानतळाला 100 कोटी रुपये दिले सिंधुदुर्गला काहीच नाही.

पालकमंत्री म्हणजे पुष्पा सिनेमातल्या डायलॉग सारखे आहेत.ना फ्लॉवर है,ना फायर है…फक्त बटरफ्लाय आहे. असे म्हणत फिल्मी स्टाईल मध्ये उदय सामंत यांच्यावर नितेश राणे यांनी टीका केली आहे.

सिंधुरत्न मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली योजना ,या योजनेसाठी अर्थसंकल्पात एक रुपयाची तरतूद नाही.मग योजना का केली ? महाविकास आघाडीचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे.

या अर्थसंकल्पात कोकणाला काय मिळालं अस विचारावस वाटत. कोकणातल्या सत्ताधारी लोकांना अर्थसंकल्प खरंच कळला का? असा मला प्रश्न विचारावासा वाटतो. काही घोषणा परत परत केल्या आहेत.

पहिल्या अर्थसंकल्पावेळीही मुख्यमंत्री यांनी भाषण केलं होत तेव्हा ते म्हणाले होते नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये दिले जातील, अशी आठवणही नितेश राणे यांनी करून दिली आहे.

Ahmednagarlive24 Office