धोका वाढला; नेवासा तालुक्याची वाटचाल शतकाकडे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून नेवासा तालुक्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून

या करोनाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगावी. तसेच फिरताना मास्कचा वापर करावा.

असे आव्हान करण्यात येत आहे, मात्र नागरिकांचा हलगर्जीपणामुळे कोरोनाबाधितांच्या आडकेवारीमध्ये वाढ होत आहे.

नेवासा तालुक्यात करोना संक्रमणाच्या दुसर्‍या टप्प्यात करोना संक्रमितांच्या संख्येचा उद्रेक झाला असून काल एकाच दिवशी 28 गावांतून 96 संक्रमित आढळून आले आहेत. सर्वाधिक 14 संक्रमित कुकाण्यात आढळले.

त्या खालोखाल 13 संक्रमित भेंडा बुद्रुकमध्ये तर 10 संक्रमित सोनईत आढळले. भेंडा खुर्द व नेवासा शहरात प्रत्येकी 7 जण संक्रमित आढळले.

तालुक्यातील 28 गावांमधून 96 बाधित आढळून आले असून हा करोना संक्रमितांचा तालुक्यातील आतापर्यंतचा उच्चांक आहे. एकाच दिवसात 96 बाधितांमुळे तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 3626 वर गेली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24