३६ लाख खर्च करून बनविलेला रस्ता उखडला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- नगरपंचायतीच्या वतीने पारनेर तालुक्यातील बुगेवाडी ते सोबलेवाडी रस्त्यासाठी ३६ लाख रुपयांचा निधी डांबरीकरणासाठी मंजूर झाला आहे.

काम अंतिम टप्प्यात असून ठेकेदाराने दोन दिवसांपूर्वी त्या रस्त्यावर डांबरीकरण पूर्ण केले. डांबरीकरण पूर्ण होऊन दोन दिवस उलटत नाही,

तोच रस्ता उखडून त्यातून माती दिसू लागल्यावर बुगेवाडी ग्रामस्थांनी तातडीने नगरपंचायतीमध्ये जाऊन मुख्याधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्याकडे रस्ता कामाविषयी तक्रार केली.

कुमावत यांनी स्वतः रस्त्याच्या कामावर जाऊन ठेकेदारास डांबरीकरण व्यवस्थित करून देण्याचे आदेश दिले.

दरम्यान नगरपंचायतीच्या ठेकेदाराने केलेल्या बुगेवाडी ते सोबलेवाडी रस्त्याचे डांबरीकरण अवघ्या दोनच दिवसांत उखडले असल्याने नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

या रस्त्याचे चांगले डांबरीकरण व्हावे तसेच बांधकाम विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चौकशी केल्यानंतरच बिल अदा करावे. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24