दरोड्याची टोळीला पोलीस पथकाने मुद्देमालासह केले जेरबंद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे दरोडा टाकणारी टोळी दोन पोलिसांनी केवळ 48 तासात जेरबंद केली आहे.

तसेच गुन्ह्यातील 20 लाख 40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची महत्वपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व कर्जत पोलिस पथकांनी संयुक्त कारवाई केली आहे.

पोलिसांनी या कारवाई अंतर्गत एवन हैवान काळे (वय 30, रा. चिखली ता. आष्टी जि. बीड), मनीषा एवन काळे (वय 35), रेखा जनार्दन काळे (रा. माहीजळगाव ता. कर्जत जि. अहमदनगर), कांचन एवन काळे (रा. चिखली ता.आष्टी जि. बीड) आणि एक अल्पवयीन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, माहिजळगाव ( ता. कर्जत) येथे दि.5 मे रोजी दरोडा व घरफोडी चोरी झाल्याचा कर्जत पोलिस ठाण्यात दाखल

गुन्हा हा एवन काळे (रा. चिखली जि. बीड) याने व त्याचे साथीदार यांनी मिळून केल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपींची पूर्ण माहिती घेऊन स्थानिक गुन्हे शाखा पथक व कर्जत पोलिसांनी सापळा लावून आरोपीचा पाठलाग करून त्याना पकडले.

या दरम्यान आरोपींच्या घराची तपासणी केली असता, चोरी गेलेला मुद्देमाल मिळून आला. गुन्ह्यातील चोरीस गेलेले दागिने व इतर चोरीतील सोन्याचे दागिने असा एकूण 30 तोळे 15 लाख रुपयांचे जप्त करण्यात आले.

तसेच आरोपीच्या घरातून एक रामपुरी चाकू, लोखंडी खटवणी, 30 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, पाच लाख रुपये किमतीचे स्कार्पिओ (एमएच 17, एजे 3598) व रोख रक्कम असा एकूण 20 लाख 40 हजार 500 रुपये किमतीचे दागिने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24