अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. नगर, पुणे सोलापूर जिल्ह्यांत घरफोड्या, गंभीर दरोड्याचे गुन्हे यांच्यावर दाखल आहे.

श्रीगोंदा पोलिसांनी हि कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अक्षय नवनाथ पवार व संतूर नवनाथ पवार (रा. भगतवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर), सुरेश दसऱ्या भोसले (रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) असे आरोपींचे नावे आहे.

त्यांच्याकडून १० हजार रुपये किमतीचे बागेतून चोरलेले लिंबू व एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सुरेश राजाराम गावडे (रा. काष्टी) यांच्या शेतातील लिंबू चोरीस गेल्याची फिर्याद दाखल झाली होती.

या गुन्ह्याचा तपास करत असताना श्रीगोंदा तालुक्यात चोरी आणि दरोडा या गुन्ह्यांतील हवे असलेले आरोपी खडकी (ता. दौंड) येथील शिवारात असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी जेरबंद केले. आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली.