दरोडेखोरांनी चाकूच्या धाकावर घरातील व्यक्तींसमोरच लुटली लाखोंची रोकड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- घरात घुसून रात्री दोन ते अडीचच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत तसेच घरातील व्यक्तींना वेठीस धरत साडे नऊ तोळे सोने व 1 लाख 35 हजार रोकड लुटली.

हि धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील दौंड वस्ती परिसरात घडली आहे. दरम्यान दरोडेखोरांनी येथील माजी वनाधिकारी सुरेश दौंड तसेच निपाणी वडगाव येथील माजी सरपंच आशिष दौंड यांच्या घरावर हा दरोडा टाकला आहे.

येथील वनाधिकारी दौंड तसेच निपाणी वडगाव येथील माजी सरपंच आशिष दौंड यांनी घटनेची माहिती परिसरातील नातेवाईक यांना फोनवरून कळविली.

यावरून परिसरात नातेवाईक व शेजारी यांच्या मदतीने दरोडेखोरांचा शोध घेतला असता ते फरार झाले होते. घटनेची माहिती समजताच श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली.

तसेच अहमदनगर येथील एलसीबी पथक पाचारण करण्यात आले होते. सदर दरोडेखोरास तात्काळ जेरबंद करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय दुधाडे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24