Bank Rules : 1 जानेवारीपासून या बँकांचे नियम बदलणार, पाहा नवीन नियम

Bank Rules : बँकेत लॉकर असणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण नवीन वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून बँक लॉकर असणाऱ्या ग्राहकांसाठी नियम बदलणार आहे.

हे नियम 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे लॉकर असणाऱ्या ग्राहकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. जाणून घेऊयात नियम.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

1 जानेवारीपासून बँकेचे काही नियम बदलले जाणार आहेत. या नियमांनुसार, बँकांना आता लॉकरची रिक्त आणि प्रतीक्षा यादी दाखवावी लागणार आहे. तसेच ग्राहकांकडून बँकेला एकाच वेळी तीन वर्षांसाठी भाडे घेण्याचा अधिकार असणार आहे.

बँक त्यांच्याद्वारे अंमलात आणलेल्या लॉकर करारामध्ये कोणत्याही अनुचित अटींचा समावेश होणार नाही, याची खात्री करणार आहे. ग्राहकांचा विचार करून घेऊन हा बदल केला आहे.

निष्काळजीपणामुळे बँका आपली जबाबदारी टाळतात असे दिसून येत आहे. त्यामुळे आता नवीन नियम लागू झाल्यानंतर बँकांना आपली जबाबदारी निश्चित करावी लागणार आहे.

नियमांनुसार लॉकरमध्ये ठेवलेल्या ग्राहकाच्या कोणत्याही वस्तूचं नुकसान झाले तर बँकेला ते भरून काढावे लागेल. परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे ही बँकेची जबाबदारी असल्याचे आरबीआयचे मत आहे.  पंजाब नॅशनल बँक सारख्या मोठ्या बँका ग्राहकांना एसएमएसद्वारे या नियमांची माहिती देत ​​आहेत.