अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News :- औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील निंगोंदगाव येथील शेतात हरभरा धान्य मळणी यंत्रात (थ्रेशर मशीन) हरभरा तयार करत असताना मशीनमध्ये अडकून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.
कविता अरुण दरेकर (वय ३६) असे मृत महिलेचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, कविता दरेकर ह्या आपल्या कुटुंबातील कुटुंबासह मळणी यंत्राच्या साहाय्याने ज्वारीचं धान्य काढत होत्या.
त्यावेळी यंत्राखालील जमा झालेला भुसा काढण्यासाठी त्या वाकल्या असता त्यांच्या गळ्यातील स्कार्प मळणी यंत्रामध्ये अडकला, त्यामुळे त्यांचे केसासहित डोकं यंत्रात ओढले गेले.
त्यामुळे उपस्थितीत नातेवाईकांनी तात्काळ यंत्र बंद करून कविता यांना बाहेर काढले. त्यानंतर तातडीने त्यांना गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
परंतु, डोक्याला गंभीर मार लागल्याने तसेच अति रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. याप्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.