अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- ज्यातील कोरोना मुक्त झालेल्या गावांमध्ये इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्याबाबत ५ जुलै रोजी शासन निर्णय जाहीर केला होता. मात्र त्यात काही तृटी असल्याचे कारण देत काही तासातच तो संकेतस्थळावरून हटवला होता.
मात्र, बुधवारी, ७ रोजी पुन्हा नव्या मार्गदर्शक तत्वांसह नवा शासन निर्णय जाहीर झाल्याने कोरोनामुक्त गावांमध्ये चला मुलांनो शाळेत चला म्हणत पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजणार आहे.
शाळा सुरू करण्यापूर्वी किमान एक महिना कोरानाचे रुग्ण न सापडलेल्या गावांमध्ये शाळा सुरू होणार आहे. त्यासाठी शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे. पालकांची लेखी समंती लागणार आहे.
मात्र उपस्थितीबाबत मुलांना कोणतीही सक्ती करता येणार नाही. शाळांनाही शालेय परिसरात कोरोना प्रतिबंधतात्मक नियमांची अमंलबजावणी करावी लागणार आहे.
शक्य असल्यास खुल्या परिसरात वर्ग भरवण्याचे आवाहान करण्यात आले असून विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी दोन सत्रात विभागणी करावी लागणार आहे. भरण्यापूर्वी व सुटल्यावर शाळा निर्जंतुकीकरण करावी लागणार आहे.