दुसरा टप्पा ! पहिल्या दिवशी 226 व्यक्तींनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- १ मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. दरम्यान, सोमवारी जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थेत थेट आलेल्या ४५ ते ६० वर्षाच्या सामान्य व्यक्तींची शासकीय पोर्टलवरून नोंदणी करून त्यांना करोना लस देण्यात आली आहे.

यात ४५ ते ५० वर्षाच्या १५ तर ६० पेक्षा अधिक वय असणार्‍या २११ अशा २२६ सामान्यांनी काल करोनाची लस घेतली. सरकारने जाहीर केल्या प्रमाणे करोना लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना, तसेच ज्यांना विविध आजार आहेत

अशा ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याची मोहीम १ मार्चपासून देशभर सुरू झाली. मात्र ६० वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लसीकरण देण्याबाबत नियोजन शासनाने केले. मात्र त्यासाठी आवश्यक असणारी नोंदणीच त्रासदायक ठरत असून, ऑनलाइन नोंदणीतील अडथळ्यांमुळे पहिल्या दिवशी कोणालाही लसीकरण होऊ शकले नाही.

या लसीकरणासाठी प्रथम कोविन अ‍ॅप, आरोग्य सेतू अ‍ॅप किंवा कोविन संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. ही नोंदणी करतानाच मोठ्या अडचणी येत आहेत. कोविन डॉट जीओव्ही डॉट ईन या संकेतस्थळावर नोंदणी करताना मोबाइल क्रमांक, एखादे ओळखपत्र व त्याचा क्रमांक दिल्यावर संबंधित मोबाइलवर ओटीपी दिला जातो.

त्यानंतर जन्मतारीख टाकल्यानंतर रजिस्ट्रेशन होते; परंतु ही प्रक्रिया करताना नोंदणीच होत नाही, अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणेला याबाबत काय सूचना आहेत, यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे विचारणा करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24