कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आपलाच बेजबाबदारपणा कारणीभूत : मुश्रीफ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- कोरोनाच्या काळात ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असून जिल्ह्यात नगर, संगमनेर आणि श्रीरामपूर येथे ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली जाणार आहे.

श्रीरामपूर येथे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार आहे. शिर्डी येथे लवकरच २ हजार बेडचे जम्बो कोविड रुग्णालय सुरू होणार आहे. यात २०० बेड, व्हेंटीलेटर आयसीयू सुविधा, १ हजार बेड ऑक्सिजन सुविधा असणार आहे.

या रुग्णालयामुळे सहा तालुक्यातील रुग्णांची मोठी व्यवस्था होणार आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर आपण गेली तीन चार महिने गाफील राहिलो. बेजबाबदारपणे वागल्यामुळेच करोनाची दुसरी लाट घातक ठरत आहे.

आताच आपण जबाबदारीने वागलो, तर जुलै ऑगस्टमध्ये येणारी करोनाची तिसरी लाट घातक ठरणार नाही, असे आवाहन नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. पालकमंत्री हसन मुश्रीफ शुक्रवारी श्रीरामपूर दौऱ्यावर आले असता

विश्रामगृहावर अधिकारी, पदाधिकाऱ्यांबरोबर कोरोबाबतचा आढावा घेतला यावेळी मुश्रीफ म्हणाले, खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर बिल आकारले जात असून त्यांच्या बिलाचे ऑडीट झाले पाहिजे. अशा रुग्णालयांवर अंकुश ठेवले पाहिजे.

त्यामुळे नगरला उपचारासाठी जाणारे कमी होऊन शिर्डी उपचार घेऊ शकतील. तसेच श्रीरामपूर येथील म्हाडामध्ये कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी कोविड रुग्णालय उभारणार असेल, तर त्याला लगेच परवानगी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानुसार म्हाडामध्ये ३२ बेड ऑक्सिजन, २ व्हेंटीलेटर आणि ६८ साधे बेड असलेले हनुमान ट्रस्टचे कोविड रुग्णालय उभे राहणार असल्यामुळे श्रीरामपूरकरांची मोठी गैरसोय दूर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24