कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून दुकानांचे शटर होणार डाऊन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-राज्य शासनाने रविवारी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नुकतेच जिल्ह्यासाठी काही आदेश जारी केले आहे.

राज्य सरकारच्या नियमावलीप्रमाणे दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू राहणार आहे. सोमवार ते शुक्रवार या पाचही दिवशी सर्व दुकाने, मॉल्स, मार्केट बंद राहणार आहे. शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असेल.

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. हा आदेश ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर हे आदेश दिले जात असताना काही गोष्टींना यामधून सूट देण्यात आली आहे

त्यामध्ये रुग्णालये, रोगनिदान केंद्रे, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधालये, औषध कंपन्या, अन्य आरोग्यविषयक व वैद्यकीय सेवा, किराणा मालाची दुकाने, भाजीपाला दुकाने, दुग्धालये, बेकरी,

कन्फेक्शनरी, अन्नपदार्थ विक्री दुकाने, सार्वजनिक वाहतूक, ट्रेन, टॅक्सी, ऑटो, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून देण्यात येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा, सर्व प्रकारची मालवाहतूक,

कृषिविषयक सर्व सेवा, ई- कॉमर्स, प्रसारमाध्यमांच्या संस्था, आपत्ती व्यवस्थापनाने घोषित केलेल्या आवश्यक सेवा. याशिवाय एमआयडीसीमधील कारखाने सर्व नियमांचे पालन करून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना नियमांचे पालन करणे नागरिकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. याची पायमल्ली झाल्यास संबंधीतानावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ठ केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24