अहमदनगर Live24 टीम, 12 जुलै 2021 :- करोनाची दुसरी लाट येऊन सहा महिने पूर्ण होत असतानाही अद्याप महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याचं चित्र आहे. राज्यातील आकडेवारीने पुन्हा एकदा प्रशासनाची चिंता वाढवली आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या १० दिवसांत महाराष्ट्र आणि केरळमध्ये गेल्या १६ महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ पहायला मिळाली आहे. महाराष्ट्रात फक्त गेल्या १० दिवसांत तब्बल ७९ हजार ५९५ नवे रुग्ण आढळले आहेत राज्यातील सातारा,
सांगली, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि बुलढाणा या आठ जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे प्रमाण अजून अधिक आहे. त्यापैकी कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे या जिल्ह्यातील कोरोना संसर्ग जूनच्या शेवटच्या आठवड्यात काहीसा कमी झाला होता.
मात्र २७ ते ३ जुलै या आठवड्यात पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली. पुन्हा प्रमाण वाढले. त्यातच सध्या सातारा आणि कोल्हापूरचे कोरोना संसर्ग प्रमाण दोन आणि तीन टक्क्यांवर पोहचले आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांची चिंता वाढली आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेला सहा महिने पूर्ण होऊनदेखील महाराष्ट्र आणि केरळमध्ये रुग्णसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढतीये याचं कोणतंही योग्य उत्तर मिळू शकलेलं नाही. याबाबत अनेक अंदाज व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान दोन्ही राज्यातील सार्वजनिक आरोग्य अधिकारी पारदर्शकता आणि योग्य माहिती देण्यात असल्याने आमची संख्या जास्त दिसत असल्याचं म्हटलं आहे. करोनाची दुसरी लाट पुन्हा एकदा कहर करत असल्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.
“करोनाच्या लाटेने शिखर गाठले असताना दोन्ही राज्यांमध्ये रुग्ण आढळले होते. रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.