वडिलांचे कष्ट पाहून मुलगा झाला व्यथित; मुलाने घरीच बनविले कांदा छाटणी यंत्र

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्याला त्याच्या पिकांचा आर्थिक आधार आहे. यातच श्रीगोंद्यातील शेतकऱ्याला कांदा पिकाचा मोठा आधार आहे.

मात्र, हा कांदा काढणी, छाटणी यात वेळ आणि पैसा खर्च होतो. आपल्या शेतकरी वडिलांचे होत असलेले हाल मुलाला पहावले गेले नाही. वडिलांच्या कष्टाचा भार कमी करण्यासाठी जिद्दी मुलाने थेट कांदा छाटणी यंत्र तयार केले.

ही गोष्ट आहे श्रीगोंदे येथील वैभव बाळासाहेब वागसकर हा महाविद्यालयीन तरुणाची. वैभवला संशोधन करण्याची आवड असल्याने लहानपणापासूनच वेगवेगळे प्रयोग करत आला आहे. तो सध्या शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात कला शाखेच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे.

राज्यात कांदा हे पीक खूप मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या पिकासाठी वेळ आणि खर्च खूप जास्त होतो. वैभवचे चुलते रामचंद्र वागसकर व वडील बाळासाहेब वागसकर हे नेहमी कांद्याचे पीक घेतात. वडिलांचे कष्ट पाहता एखादे कांदा काढणी यंत्र असते तर शेतकऱ्यांना खूप फायदा होईल ही कल्पना वैभवला सुचली.

यावर त्याने संशोधन सुरू केले. तीन वर्ष संशोधन करून प्रत्यक्षात आठ महिने त्यावर राबला आणि यंत्र तयार झाले. वैभवने बनविलेले यंत्रामध्ये कांदा हवी तसा काटणी करते. कांद्याची पात किती अंतरावर कापायची याचा बदल करता येतो. हे मशीन दोन पद्धतीने काम करते,

थेट जमिनीतूनही कांदा हार्वेस्टिंगही करता येतो आणि हाताने काढलेला कांद्याची पात वेगळी करता येते. या मशीनचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. लवकरच या मशिनचे निर्मिती सुरू करणार आहोत. यासाठी पयोजा ऍग्री इंनोवेशन्स या या उद्योगाची स्थापना करण्याचे काम चालू आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24