राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :-  राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. तसा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून पंचगंगा नदीच्या पाण्याने चौथ्यांदा धोक्याची पातळी गाठली आहे.

दरम्यान, राधानगरी धरणाच्या चार दरवाज्यामधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई, ठाण्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

तसेच रायगड, रत्नागिरीत जोरदार पाऊस बरसणार आहे. तर पालघरमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टी निर्माण झाल्याने आज पुन्हा जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

दमण, पालघर, कल्याण, रायगड, पुणे- नाशिक घाट क्षेत्र, जुन्नर आणि रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन ते चार तासांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दमदार पावसामुळे मुंबई, पुणे नाशिकमधली धरणं भरली आहेत. मराठवाड्यातही समाधानकारक पाऊस झाला आहे.

तर जायकवाडीसह प्रमुख धरणांत चांगला पाणीसाठा झाला आहे. दरम्यान मुंबई आणि परिसरात काल दिवसभरात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून आले. तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होता. दरम्यान, कोकणात ठिकाणी चांगला पाऊस झाला.

Ahmednagarlive24 Office