अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- संपूर्ण महाराष्ट्रात सध्या आमदार निलेश लंके आणि त्यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरची चर्चा आहे.गेल्या अनेक दिवसांपासून या कोविड सेंटर बद्दल ऐकत होतो.
परंतु आज प्रत्यक्ष पाहिल्यावर निलेश लंके यांचा अभिमान वाटत आहे. या कोरोनात एकाच कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील लोक दूर जात आहेत परंतु आ.लंके यांनी हजारो रुग्णांना जीवनदान दिले आहे.
राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांच्या या कार्याचा गौरव करतो.असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढले.
आमदार निलेश लंके यांनी शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर या नावाने ११०० बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. येथून हजारो रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
आजही मोठ्या प्रमाणात येथे रुग्ण उपचार घेत आहेत. लोकसहभागातून सुरू केलेले हे कोविड सेंटर राज्यासाठी रोल मॉडेल ठरत आहे.
एकंदरीतच एक आदर्श असे कोविड सेंटर आमदार निलेश लंके यांनी येथे उभारले आहे. त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे.
आमदार असावा तर निलेश लंके यांच्या सारखा अशा प्रकारचे मत राज्यातील सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. शनिवारी जलसंपदामंत्री जयंत पाटील अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
त्यानुसार त्यांनी संध्याकाळी भाळवणी येथील कोविड सेंटरला भेट देवून पाहणी केली असता येथील सर्व व्यवस्था पाहून ते देखील भारावले व त्यांनी आमदार लंके यांना त्यांच्या या कामाबद्दल शाबासकी दिली.