राज्यात कोविड चाचणीच्या फिरत्या प्रयोगशाळा होणार; ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-कोरोनाच्या चाचणीसाठी आगामी काळात संपूर्ण राज्यभरात फिरत्या प्रयोगशाळा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

एनएबीएल ॲक्रीडेटेड आणि आयसीएमआरची मान्यता असलेल्या स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

या माध्यमातून फक्त ४९९ रुपयांमध्ये कोरोना चाचणी होणार असून याचा रिपोर्टही अवघ्या २४ तासात मिळणार आहे. सरकारने कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.

कमी वेळेत त्या चाचणीचा अहवाल मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा नक्की लाभ होईल. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला तेव्हा पुणे आणि मुंबईत कस्तुरबा येथे दोन ठिकाणीच कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यरत होत्या. शासनाने काही दिवसांमध्ये ही संख्या ५०० वर नेली.

माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानातून कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांचा शोध घेण्यात आला. संशयितांची तपासणी करतांना सहव्याधीग्रस्तांचा शोध ही घेण्यात आला.

कोरोनावर आता लस उपलब्ध झाली असली तरी विविध देशात कोरोनाचे नवे स्ट्रेन येताना दिसत आहेत. त्यावर संशोधनही सुरु आहे. त्यामुळे आज ही कोविड रुग्णांचा शोध घेऊन त्यावर उपचार करण्याला शासनाचे प्राधान्य आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24