राज्याचा रुग्ण रिकव्हरी रेट 95 टक्क्याहून अधिक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- राज्यात २४ तासांत ९ हजार ३३६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून १२४ जणांच्या मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख ९८ हजार १७७वर पोहोचली आहे.

यापैकी आतापर्यंत १ लाख २३ हजार ३० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १ लाख २३ हजार २२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात कोरोनाचे प्रमाण हळूहळू नियंत्रणात येत असेल तरी आज, रविवारी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.

काल, शनिवारी राज्यातील रिकव्हर रेट ९६ टक्के एवढा होता. पण आज त्यात घसरण होऊन ९५. ९१ टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आज मोठ्या संख्येने करोनाबाधिता आढळून आले आहेत. तर, करोनामुक्त झालेल्यांची संख्या ही नवीन आढळून आलेल्या करोनाबाधितांच्या तुलनेत बरीच कमी असल्याचेही समोर आले आहे.

खरंतर मागील काही दिवसांमध्ये सातत्याने दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त आढळून येत होती. परंतु आता पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या जास्त दिसत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24