अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- गेल्यावर्षी करोना लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात कुटूंबांचे स्थलांतर झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भिती व्यक्त होत होती.
यामुळे यंदाचे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहिम गंभीरपणे राबविण्याचे आदेश शिक्षण विभागाला देण्यात आले होते. त्यानूसार 1 ते 10 मार्च दरम्यान जिल्ह्यात प्रत्येक शाळेतील शिक्षकांसह गावातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील या मोहिमेत सहभागी होवून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेत होते.
या मोहिमेत 833 शाळाबाह्य आढळून आलेले आहेत. नगर जिल्हा परिषदेने स्वत:च्या पातळीवर राबविलेल्या मोहिमेत मार्चपूर्वीच 1 हजार 3 विद्यार्थ्यांना शाळात दाखल करण्यात आलेले आहे. यामुळे मोहिम काळात सापडलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे.
शाळाबाह्य मुलांची तालुकानिहाय आकडेवारी :- शेवगाव 80, पाथर्डी 48, कर्जत 33, अकोले 23, जामखेड 2, श्रीगोंदा 110, संगमनेर 23, कोपरगाव 18, श्रीरामपूर 257, राहाता 28, राहुरी 183, नेवासा 12, पारनेर 32, नगर 34 असे आहेत.