कोरोना संकटातही शेअर बाजार वधारला; गुंतवणूकदार झाले मालामाल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-बुधवारी शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक वाढीसह ग्रीन मार्कवर उघडला.

सेन्सेक्स 789 अंक म्हणजेच 1.61% वर, बीएसई वर 49,733.84 वर बंद झाला. एनएसई वर निफ्टी 211.50 अंक म्हणजेच 1.44% वर 14,864 वर बंद झाला.

या शेअर्समध्ये वाढ झाली :- आज सकाळी बाजार सुरू झाल्याच्या सुमारास बजाज फायनान्सचे शेअर्स तेजीत ट्रेड करत आहेत.

बजाज फायनान्सचे शेअर्स% टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. बजाज फिनसर्व्हचा स्टॉकही 2% पेक्षा जास्त वर ट्रेड करीत आहे. बजाज ऑटोचे शेअर्सही वाढले आहेत.

भारती एअरटेलच्याही शेअर्समध्येही वाढ आहे. टाटा मोटर्सचे शेअर्स 2.54% वर ट्रेड करीत होते. याशिवाय आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली.

दुसरीकडे आयटीसी, टीसीएस, टीसीएस, डीआर रेड्डी, एलटी आणि एचसीएल टेक यांचे शेअर्स ग्रीन मार्कसह बंद झाले.

या शेअर्समध्ये घट :- त्याचबरोबर आज ब्रिटानिया, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, हिंडाल्को, एचडीएफसी लाइफ आणि नेस्ले इंडिया, सिप्ला यांचे शेअर्स खाली आले आहेत.

काय होते जागतिक बाजारपेठेची स्थिती ? :- जाणून घ्या S&P 500 आणि Dow Jones फ्लॅट पातळीवर बंद झाले.

मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट आणि अन्य कॉर्पोरेट दिग्गजांकडून आलेल्या कमाईच्या रिपोर्टवर गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रित केले.

Dow Jones इंडस्ट्रियल एव्हरेज 0.01% वाढीसह 33,984.93 अंकांवर, तर S&P 500 0.02% खाली 4,186.72 वर बंद झाली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24