शेअर बाजार कोसळला; गुंतवणूकदारांना बसला कोट्यवधींचा फटका

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- भारतीय शेअर बाजारात विक्रीचा कल सोमवारीही कायम राहिला. यामुळे सोमवारी सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांपेक्षा अधिक घसरल्याचे पाहायला मिळाले. यामुळे तब्बल दोन महिन्यांनंतर सेन्सेक्स 59000 च्या खाली आला आहे.

सेन्सेक्स 1170 अंकांनी घसरून 58,465 वर स्थिरावला; निफ्टी 348 अंकांनी घसरून 17,416 वर आहे सध्या शेअर बाजाराची सर्वात मोठी चिंता अमेरिकी फेडरलच्या वाढत्या व्याजदराची आहे.

कारण अमेरिकेत यावर लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. अशा स्थितीत विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतात पैसा गुंतवणे अधिक फायदेशीर ठरणार नाही.

त्यामुळे ते भारतातील आपला पैसा काढून घेतील, याचा नकारात्मक परिणाम आज बाजारावर दिसून आला. तसेच आज सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये,

रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) 4 टक्क्यांहून अधिक बुडाली कारण कंपनीने 15 अब्ज डॉलर्सच्या मागणीसाठी सौदी अरामकोला तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल व्यवसायातील 20 टक्के हिस्सा विकण्याचा प्रस्तावित करार सोडला.

इतर पिछाडीवर असलेल्यांमध्ये बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, एसबीआय आणि टायटन यांचा समावेश आहे. दुसरीकडे भारती एअरटेल, एशियन पेंट्स, पॉवरग्रीड आणि इंडसइंड बँक वधारले.

Ahmednagarlive24 Office