अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाची आकडेवारी वाढत असल्याने त्याचा काहीसा परिणाम हा शेअर बाजारावर होऊ लागल्याचे दिसून येत आहे, यातच आज शेअर बाज्रामध्ये चांगलीच घसरण झाली आहे.
आज बीएसई सेन्सेक्स 1004 अंकांची घसरण करीत किंवा 2 टक्क्यांनी घसरून 48,761 वर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टीमध्येही मोठी घसरण नोंदली गेली आहे. निफ्टी 247 अंक म्हणजेच 1.66% गमावत 14,647 वर बंद झाला.
बीएसईचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल निशाण्यावर बंद झाले आहेत. 30 पैकी केवळ 3 निर्देशांक वाढीसह बंद झाले, आज सकाळी सेन्सेक्स 485 अंकांनी म्हणजेच 0.97% ने खाली 49,280.77 वर खुला होता.
त्याच वेळी, निफ्टीने 138 अंक म्हणजेच 0.93%, 14,756 वर उघडले. या शेअर्समध्ये वाढ आज ONGC, Sunpharma, Dr reddy या शेअर्समध्ये वाढ झाली. ONGC च्या शेअर्समध्ये सर्वाधिक 4% वाढ झाली.
या व्यतिरिक्त, जवळजवळ सर्वच रेड मार्कवर बंद झाले. NSE मधील ONGC, COAL INDIA, DIVISLAB, GRASIM, IOC शेअर्स आजच्या टाॅप गेनर्समध्ये होते. या शेअर्समध्ये घसरण POWER GRID,
INFOSYS, BAJAJ-AUTO, NTPC, INDUSIND Bank, Bajaj finance, ITC या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये घसरण झाली. त्याच वेळी HDFC, HDFC BANK, KOTAK BANK, ICICI BANK आणि ASIANPAINT यांच्या शेअर्स मध्ये घसरण झाली.