शेअर बाजार कोसळला; गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक वाढली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-गेल्या चार दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होत आहेत. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५६२ अंकांनी म्हणजे १.१२ टक्‍क्‍यांनी कमी होऊन ४९,८०१ अंकांवर बंद झाला.

त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १८९ अंकांनी कमी होऊन १४,७२१ अंकांवर बंद झाला. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झाली सर्वात मोठी घसरण सेन्सेक्समध्ये ऑइल आणि एनर्जी सेक्‍टर शेअर्सनी आज सर्वात वाईट कामगिरी केली.

त्यापैकी ओएनजीसी शेअर टॉप लुझर ठरला. कंपनीच्या शेअरमध्ये ५ टक्के मोठी कपात झाली. याशिवाय बीपीसीएल ४.८० टक्के, टाटा मोटर्स ४.४२ टक्के, अदानी पोर्टमध्ये ४.०६ टक्के आणि कोल इंडियामध्ये ४.०२ टक्के घसरण झाली. या शेअर्समध्ये सर्वात मोठी वाढ नोंदली गेली आज बीएसई सेन्सेक्समध्ये आयटीसी शेअर्स टॉप गेनर झाला.

कंपनीच्या शेअर्समध्ये १.३२ टक्के वाढ नोंदविण्यात आली. याशिवाय टेक कंपनी इन्फोसिसचे शेअर्स ०.२२%, एचडीएफसीचा शेअर ०.२१% आणि टीसीएस ०.०९% नी खाली आला.

आज गुंतवणूकदारांनी आयटी शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली. भारत व्यतिरिक्त शांघाय आणि टोकियो स्टॉक मार्केट आशियाई बाजारात रेड मार्कवर बंद झाले. त्याच वेळी, हाँगकाँगची हेंगसेंग ग्रीन मार्कवर बंद झाली. याखेरीज युरोपियन बाजारात आज संमिश्र ट्रेंड होता.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24