अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- या हप्त्याच्या सुरुवातीलाच शेअर मार्केटमध्ये चांगलीच पडझड झाल्याचे पाहायला मिळाली होती. यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले होते.
यातच आज हप्त्याच्या शेवटच्या दिवसाला पुन्हा एकदा शेअर मार्केटमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाली. आज सेन्सेक्समधल्या टॉप-30 समभागांमधले 8 समभाग हिरव्या चिन्हात आणि उर्वरित 22 समभाग लाल चिन्हात बंद झाले.
आज सेन्सेक्स 190 अंकांच्या (-0.33%) घसरणीसह 57,124च्या स्तरावर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 69 अंकांच्या (-0.40%) घसरणीसह 17,003 अंकांच्या स्तरावर बंद झाला.
आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. साप्ताहिक आधारावर या आठवड्यात सेन्सेक्सनं 2.83 टक्क्यांची घसरण नोंदवली. दोन आठवड्यांच्या सततच्या तेजीनंतर या आठवड्यात बाजारात मोठी घसरण झालीय.
आजचे टॉप गेनर्स आणि लूजर्स :– आज एचसीएल टेक्नॉलॉजी, टेक महिंद्रा आणि एशियन पेंट्स सर्वाधिक वाढले, तर एनटीपीसी, पॉवरग्रिड आणि महिंद्रा अँड महिंद्रा सर्वात जास्त घसरले.