अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- कोरोनामुळे आधीच चिंताग्रस्त झालेला शेतकरी पावसाच्या अनियमितपणामुळे हवालदिल झाला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या या बळीराजा यातून सावरत असताना कर्जत तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.
कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील शेतकरी रमेश शिवराम गांगर्डे यांच्या वखारीत साठवून ठेवलेल्या कांद्याचे अज्ञातांकडून नुकसान झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
कांद्याच्या वखारीत फळे पिकवण्याचे कार्पेट टाकून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, निमगाव गांगर्डा येथील शेतकरी गांगर्डे यांनी वखारीत पाचशे गोण्या कांदा साठवून ठेवला होता.
या वखारीत अज्ञातांकडून जागोजागी कार्पेट टाकण्यात आले. कार्पेटमुळे कांदा सडून कांद्याचे सुमारे ५० टक्के नुकसान झाले.