अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथे जोरदार वाऱ्यामुळे वीजवाहक तारेवर झाडाची फांदी पडली.
याच झाडाखाली भाजीपाला विकणारे ज्ञानदेव ताजणे यांच्या गाडीवर झाडाची फांदी पडल्यामुळे भाजीपाल्याचे व गाड्यांचे नुकसान झाले.
सुदैवाने इतर कोणाला दुखापत झाली नाही. लॉकडाऊनपासुन आश्वी बुद्रूक गावातील बाजार बंद झाल्यामुळे तसेच ताजणे मळ्यातील भाजीविक्रेते जास्त असल्यामुळे गावातील मुख्य लोणी- आश्वी- ताजणे मळा रोडवर मोठ्या प्रमाणात रोज भाजीपाला विक्रेते बसलेले असतात.
रविवारी दुपारी आलेल्या अचानक मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळामुळे रस्त्याजवळ असलेल्या गांधी याच्या शेतातील लिंबाच्या झाडाची फांदी विद्युत वाहक तारेवर पडली.
या झाडाखाली ज्ञानदेव ताजणे व त्यांचा मुलगा मनोज ताजणे नेहमीच भाजीपाला विकण्यासाठी गाडी लावत असतात.
या वादळामुळे व लिंबाच्या झाडाची फांदी पडल्यामुळे गाड्यांचे व भाजीपाल्याचे नुकसान झाले, परंतु कुणालाही काहीही झाले नाही