अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- हुबेहूब बाळासाहेबांची कॉपी असलेले पुतणे राज ठाकरे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. आजही लोकांना त्यांच्यात बाळासाहेब दिसतात.
लहानपणापासून काकांसोबत काम करून त्यांनी बाळासाहेबांचे काही गन अगदी जसेच्या तसे उचलले. 14 जून 1968 रोजी ठाकरे यांच्या कुटुंबात राज यांचा जन्म झाला.
बाळ ठाकरे हे राजकारणी व व्यंगचित्रकार होते तर त्यांचे भाऊ श्रीकांत ठाकरे हे संगीतकार होते. श्रीकांत ठाकरे यांनी आपल्या मुलाचे नाव स्वरराज ठाकरे ठेवले. मात्र काकांच्या पावलावर पाऊल ठेवलेला पुतण्याही व्यंगचित्रकार झाला होता.
त्याचवेळी बाळासाहेबांनी राज यांना सल्ला दिला की, व्यंगचित्रकार म्हणून नाव छोट पाहिजे. जसं की मी बाळासाहेब ठाकरे ऐवजी बाळ ठाकरे केलं. तुही स्वरराज ठाकरेऐवजी राज ठाकरे एवढंच नाव वापर.
काकांचा सल्ला कायम मानणाऱ्या राज यांनी हा सल्ला स्वीकारला. जसजसे राज ठाकरे मोठे होत होते, तशी लोकांमध्ये त्यांची क्रेझ वाढत होती. राज ठाकरे यांना आजवर 2 गोष्टींचा फटका त्यांच्या करियरमध्ये बसला.
त्यापैकी एक म्हणजे किनी हत्या प्रकरण आणि दुसरं म्हणजे सोनाली बेंद्रे प्रकरण. यापैकी दुसरे प्रकरण आजही चवीने चर्चिले जाते. आजही मनसेविरोधात हे प्रकरण हत्यार म्हणून सोशल मीडियावर वापरले जाते.
हा किस्सा आहे 90 च्या दशकातला. जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या एका शब्दावर महाराष्ट्र आणि प्रामुख्याने मुंबईतील राजकारण फिरत होते. सगळं बॉलिवूड मुंबईत वसलं असल्याने ठाकरे कुटुंबाचा चित्रपटसृष्टीत अनेक गोष्टीत ठाकरेंचा प्रभाव असायचा.
याच काळात राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांचे मैत्रीपूर्ण संबंध समोर येऊ लागले होते. त्या काळात राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्या अफेअरची चर्चा चित्रपटापासून राजकारणापर्यंत रंगली होती.
दोघेही एकमेकांवर मनसोक्तपणे प्रेम करत होते आणि त्यांना लग्नही करायचे होते. मात्र यात सगळ्यात मोठी अडचण होती ती राज यांच्या बाजूने, कारण हे दोघे जेव्हा प्रेमात पडले तेव्हा राज यांचे लग्न झालेले होते.
मात्र तरीही राज यांनी काही अंशी तयारी दाखवली होती. राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्या अफेअरची चर्चा होती तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे काही म्हणाले नाहीत.
पण जेव्हा लग्नाची चर्चा बाळ ठाकरेंपर्यंत पोहोचली तेव्हा मात्र बाळासाहेबांनी तातडीने राज ठाकरेंना बोलवून घेतले.
तू जर पुन्हा लग्न केलं तर पक्षाला याचा फटका बसेल तसेंच तुझं राजकीय करियर पण धोक्यात येऊ शकतं, हे त्यांनी राजला परखड सांगितले. एवढेच नाही तर हा विषय आता संपवून टाक, असेही सांगितले.
बाळासाहेबांचा सल्ला अमान्य करणे, हे राज यांना परवडणारे नव्हते. त्याला 2 कारणे होती. पहिले म्हणजे राज हे बाळासाहेबांची प्रत्येक गोष्ट ऐकायचे. दुसरे म्हणजे राज हेच शिवसेनेचे भविष्य आहे, अशी चर्चा लोकांमध्ये असायची.
बाळासाहेबांनंतर पक्ष आपल्या हातात येईल, अशी अपेक्षा आणि इच्छा राज यांनी होती. लग्नाचा निर्णयाला कल्टी दिली असली तरी नंतर अनेक दिवस त्यांचे अफेअर होते, असे म्हटले जाते.
प्रेमाला राम राम ठोकत राज ठाकरेंनी राजकारणाला महत्त्व दिले. सोनालीला ज्या कारणासाठी राज यांनी जय महाराष्ट्र केला. ती गोष्ट मात्र राज यांना कधी मिळालीच नाही. शेवटी कंटाळून राज यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करत शिवसेनेलाही जय महाराष्ट्र केला.