अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- लोणी येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या “टाकाऊ पासून टिकाऊ ”
या आगळ्यावेगळ्या गणेश उत्सव संकल्पनेतून प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचे कलाशिक्षक श्री पटेल सर व विद्यार्थ्यांनी ‘प्लास्टिक ड्रम व पी वी सी पाइप’ पासून ५.५ फूट उंचीची गणेश मूर्ती बनवली.
तसेच कोणताही खर्च न करता विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तू पासून शोभिवंत वस्तू बनवून सजावट केली. प्राणप्रतिष्ठेपूर्वी मोठ्या थाटामाटात बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली.
विद्यार्थीनिंच्या शुभहस्ते गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली व शाळेचे कोआॅर्डीनेटर श्री एम. जी. निमसे व त्यांच्या सौभाग्यवतींच्या शुभहस्ते आरती झाली.
सदर प्रसंगी विद्यालयाचे शिक्षक श्री जोसेफ सर, उमक सर, बोधक सर, पटेल सर, सय्यद मॅडम, भावसार मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.या उपक्रमास प्राचार्या डॉ रोजमीन बेलिम यांनी मार्गदर्शन केले .