साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदाचा सस्पेन्स कायम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीसाठी अजून दोन आठवड्याची मुदतवाढ शासनाच्यावतीने मागीतली असून दोन आठवड्यानंतर अधिकृत विश्वस्त मंडळाची यादी सादर करणार असल्याचे

शासनाच्या वकीलांनी सांगीतल्याने सोशल मीडियावर तिनही पक्षातील विश्वस्त पदासाठी निवड करण्यात आल्याच्या चर्चेला पुर्णविराम लागला असून करोडो साईभक्तांसाठी विश्वस्त पदाचा सस्पेन्स कायम राहिला आहे.

पुढील सुनावणी ५ जुलै रोजी ठेवण्यात आली असल्याची माहिती याचीकाकर्त्यांच्या वतीने अँड अजिंक्य काळे यांनी दिली आहे. साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीची दोन महिण्याची मुदत मार्चमध्ये संपल्यानंतर मागील पंधरा दिवसापूर्वी मा. उच्च न्यायालयाने शासनास अजून दोन आठवडे मुदतवाढ दिली होती.

त्याची सुनावणी २२ जुन रोजी ठेवण्यात आली होती मात्र उच्च न्यायालयात यादिवशी क्राईम बोर्ड असल्याने सुनावणीची तारीख काल बुधवार दि.२३ रोजी ठेवली होती. यादरम्यान साईसंस्थान अध्यक्ष उपाध्यक्ष,विश्वस्त निवडीसाठी महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू होती.

मंगळवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या वतीने निवड झालेल्या सदस्यांवर त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर हार तुरे, आतिषबाजी करत अभिनंदनाचा वर्षाव केला मात्र काल सायंकाळी मा.उच्च न्यायालयात सरकारी पक्षाच्या वकिलांनी अजुन दोन आठवड्याची मुदतवाढ घेतल्याने

विश्वस्तपदासाठीची चुरस वाढली असून दोन आठवड्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

यामुळे कालपर्यंत शर्यतीत असणाऱ्या अनेकांची धाकधूक वाढली आहे. त्यावर मा.उच्च न्यायायालयाचे मा. न्या.एस.व्ही. गंगापरूवाला व मा.न्या.एम.जी सेवलीकर यांनी सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीची नोंद घेत साईबाबा संस्थान ट्रस्टच्या विश्वस्थ मंडळ नियुक्ती संदर्भात अधिसूचना जाहीर कारणासाठी राज्य शासनास २ आठवड्याची मुदतवाढ दिली.

सदर प्रकरणात याचि काकर्त्यां च्या वतीने अँड प्रज्ञा तळेकर व अँड अजिंक्य काळे यांनी काम पाहिले तर शासनाच्या वतीने अँड डी.आर काळे, यांनी काम पाहिले पुढील सुनावणी ५ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24