अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :-तालिबानने ज्या गतीनं अफगाणिस्तानवर ताबा मिऴवला आहे ते पाहून सर्व जग हादरून गेलं आहे. तालिबान्यांनी बंदुकीच्या जोरावर संपूर्ण अफगाणिस्तानचा प्रदेश हस्तगत केला आहे.
आता तालिबानी कोणतं पाऊल उचलतात याकडे सर्वा जगाचं लक्ष लागलेलं होतं. अशातच तालिबानने पत्रकार परिषद घेत जगाला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. अफगाणिस्तानने ताबा मिळवल्यावर पहिली पत्रकार परिषद घेतली आहे. तालिबानी कोणत्याही आंतरराष्ट्रीय दूतावास किंवा संस्थेला नुकसान पोहोचवणार नाहीत.
तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय समुदयाने परवानगी दिली असल्याचं तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिदी यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं आहे.
आमच्यासोबत आधी जे लढले आहेत त्यांना आम्ही माफ केलं आहे. तालिबान कोणाचाही बदला घेणार नसून मी आश्वासन देतो की आमची माती चुकीच्या कामासाठी वापरली जाणार नाही. आम्हाला आंतरराष्ट्रीय समुदाय ओळखेल अशी आशा असल्याचं जबीहुल्ला मुजाहिदी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, इस्लामनुसार सर्व महिलांना शाळा आमि रूग्णालयांमध्ये काम करण्याची परवानगी असणार आहे. इस्लामनुसार महिलांना सर्व अधिकार मिळणार असून त्यांच्यासोबत कोणताही भेदभाव केला जाणार नसल्याचं प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिदींनी सांगितल.
दरम्यान एकीकडे तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानचे नागरिक देश सोडून जात आहेत. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गणी यांच्यासह महत्वाच्या नेत्यांनी देशाबाहेर पळ काढला आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलसह संपूर्ण भूभागावर तालिबान्यांनी वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.