टेम्पोची दुचाकीला जोराची धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-  टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील बस स्‍टॅंड समोर घडला आहे.

या अपघातात दादाभाऊ नवनाथ पवार ( वय ४० वर्षे रा. निळवंडे ) यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, निळवंडे येथील दादाभाऊ नवनाथ पवार हे दुचाकीवरून लोणी ते संगमनेर रस्त्याने वडगावपान बस स्‍टॅंड समोरुन संगमनेरच्या दिशेने प्रवास करीत होते.

यावेळी संगमनेरकडून लोणीकडे जाणाऱ्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडक एवढी जोराची होती कि या अपघातात दुचाकीस्वार दादाभाऊ पवार हे जागीच ठार झाले.

याप्रकरणी बाळासाहेब मारुती पवार यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी टेम्पो चालक राहुल सुकदेव रुपवते (रा. कासारा दुमाला ता. संगमनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर अधिक तपास करीत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24