अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Krushi News :- शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून अधिक उत्पादन कसे घेता येईल याचा शेतामध्ये प्रयत्न करत असतात. यंदाच्या वर्षी पाऊस समाधान कारक झाल्यामुळे पाणीसाठा मुबलक स्वरूपात उपलब्ध आहे.
याचा फायदा शेतकरी आपल्या शेतातील उत्पादन वाढविण्यासाठी करत असून याचा प्रत्यय सध्या दिसू लागला आहे. तर खरीप हंगामात अवकाळा मुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी कडधान्य पेरणी वर जास्त भर देत आहे.
सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम असून काही भागातील ऊस तोडणी विना तसाच शेतात उभा आहे. तर काही भागातील शेतकऱ्यांची ऊस तोड झाली असून तेथील त्या शेतकऱ्यांची ऊस तोडणी झालेल्या शेतात आंतरपीक घेण्यासाठी लगबग चालू झाली आहे. तर ऊसाच्या सरीमध्ये उन्हाळी सोयाबीनची लागवड केली जात आहे.
राज्यातील विविध भागात हा प्रयोग राबवला जात असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शेतकऱ्याला दुहेरी पिकाचे उत्पादन घेता येणार आहे.
उन्हाळी हंगामातील सोयाबीनच्या पेरणीला उशिर झाला असला तरी सोयाबीन उत्पादनाला कोणताही धोका नसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरच पडणार आहे.
ऊस हा बहरात येत असतानाच सोयाबीन काढणीला येते. शिवाय यासाठी वेगळे असे काहीच नाही. ऊसाची मशागत करीत असताना हे पीक सहज घेता येते म्हणून शेतकरी हा प्रयोग करीत आहेत.