बिबट्याची दहशत संपत नाही तोच अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तालुक्यात आले नवे संकट !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-बिबट्याची दहशत संपत नाही तोच पुन्हा जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील शेतात गव्याचे दर्शन झाले.

या गव्याने शेतात काम करत आसलेल्या शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केले आहे. त्यामुळे परीसरातील नागरीकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वंजारवाडी येथील जायभाय वस्ती येथे शेतकरी संतोष भिमराव दराडे हे आपल्या शेतात काम करीत असताना सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक या गव्याने शेतकर्‍यावर हल्ला केला.

या नंतर ग्रामस्थांना देखील या गव्याचे दर्शन झाले. या नंतर ग्रामस्थांनी या गव्याचा पाठलाग केला मात्र नंतर अंधाराचा फायदा घेत गवा पळुन गेला.

जखमी संतोष दराडे यांना फक्राबाद येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जंगली गव्यांचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून

शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. वनविभागाच्या वतीने या ठिकाणी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी परीसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24